Land Grab | भामट्यांनी 'तिला' उभे करून १० एकर जमीन हडपली

0

आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल 


 

बनावट महिला उभी करून एका महिलेची साडेचार कोटी रुपयांची १० एकर जमीन नावावर करून घेतल्याची घटना वैजापूर तालुक्यातील करंजगाव येथे ११ नोव्हेंबर २०२२ रोजी घडली. याप्रकरणी ८ जणांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा  मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



दुय्यम निबंधक कार्यालय, वैजापूर 


संभाजीनगर येथील रहिवासी अनुराधा  नंदकुमार नलावडे यांची वैजापूर तालुक्यातील करंजगाव शिवारात १० एकर २८ गुंठे जमीन होती.अनुराधा नलावडे यांचा २०२२ मध्ये अपघात झाल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.त्यामुळे त्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या. हिच संधी साधून त्यांच्या ओळखीतील काही जणांनी त्यांची जमीन परस्पर नावावर करून घेतली. वैजापूर येथील दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयात बनावट कागदपत्रे तयार करून अनुराधा यांच्या जागेवर दुसरी महिला उभी करून त्यांची साडेचार कोटी रुपयांची जमीन हडप केली. काही दिवसांनी अनुराधा नलावडे यांना ही गोष्ट लक्षात आली.


 

याप्रकरणी अनुराधा नलावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  जीवनसिंग नरसिंग बहुरे रा. नागोणीचीवाडी, गोलटगाव ता. जि. छत्रपती संभाजीनगर,  योगेश शामसुंदर घोडके रा. गल्ली नं ५ आंबेडकरनगर एन ७ सिडको,  जितेश सुभाष घागरे रा. घर नं. २२१, नेहरू पुतळ्याजवळ, छावणी, जि. छत्रपती संभाजीनगर,  कारभारी साहेबराव निघोटे रा. हडसपिंपळगाव ता. वैजापूर, दलाल पोपट अण्णा चव्हाण रा. लासूरस्टेशन ता. गंगापूर जि छत्रपती संभाजीनगर , साक्षीदार मंगेश सीताराम देशमुख रा. जी. १४ संभाजी कॉलनी, एन ६ सिडको, जि. छत्रपती संभाजीनगर,  अमोल सज्जन काळे रा. रमानगर, छत्रपतीसंभाजीनगर व अन्य एक अनोळखी महिला अशा एकूण आठ जणांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास फौजदार प्रविण पाटील करीत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
To Top