Vote From Home | 'एवढे' मतदार करणार 'वोट फ्राॅम होम', 'घरच' असणार मतदान केंद्र

0

१०० मतदारांनी निवडला पर्याय



 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच वृद्ध व दिव्यांग मतदारांना घरबसल्या मतदान करता येणार आहे. वैजापूर विधानसभा मतदारसंघातील ८५ वर्षांंपेक्षा अधिक वय असलेल्या ७१ तर २९ दिव्यागांनी घरूनच मतदान करण्याचा पर्याय निवडला आहे. यासाठी विशेष बीएलओ, पर्यवेक्षक व अन्य कर्मचारी तैनात राहणार आहे.






      'वोट फ्रॉम होम' या मोहिमेतंर्गत प्रपत्र १२ डी अंतर्गत बीएलओ शिवाय ऑनलाईन पद्धतीने देखील या मतदारांना अर्ज करता येणार आहे. वैजापूर विधानसभा मतदारसंघात तीन हजार ३१२ दिव्यांग व ५ हजार ५३१ वृद्ध मतदार आहेत. यापैकी मतदारांची सहमती घेऊन ७१ वृद्ध व २९ दिव्याग मतदारांनी 'वोट फ्रॉम होम'ची मागणी केली होती. दरम्यान या मतदारांचे मतदान बॅलेट पेपरवर घेतले जाणार आहे. 



असे होणार मतदान


'वोट फ्रॉम होम' साठीपात्र मतदारांपर्यँत बीएलओ पोहचतील. या ठिकाणी मतदानासाठी आवश्यक असा सेटअप लावून मतदारांचे हस्ताक्षर घेऊन मतदान प्रक्रिया पार पडेल. यानंतर मतपत्रिका मतपेटीत बंद करण्यात येतील. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रिकरण करण्यात येईल.



घरबसल्या मतदान


ज्या ठिकाणी मतदान होणार आहे तेथे पीठासीन अधिकारी, मायक्रो ऑब्जर्वर, मतदान अधिकारी,  व्हिडियोग्राफर, बीएलओ,सुरक्षा कर्मचाऱ्यांची टीम राहणार आहे.  घरातील एका खोलीत मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे. मतदाराने बॅलेट पेपरवर आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर टीक केल्यानंतर एका सीलबंद पेटीत मतपत्रिका टाकता येणार आहे. ही मतदान  प्रक्रिया सेक्टर अधिकाऱ्याच्या उपस्थितीत पार पडणार आहे. ज्या मतदारांनी वोट फ्रॉम होम विकल्प निवडला असेल त्यांना मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही.



 ३६३ जवान बजावणार  हक्क


यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वैजापूर विधानसभा मतदार संघातील सैन्य दलात असलेल्या ३६३ जवानांची मतदारयादी तयार करण्यात आली आहे. दरम्यान त्यांना मतदानाचा हक्क ऑनलाईन की बॅलेट पेपर? याबाबत अद्याप स्पष्टता नसून जिल्हा निवडणूक विभागाकडून याबाबतचे निर्देश आल्यानंतरच यासंबंधीचे चित्र स्पष्ट होणार आहे.


छाया स्त्रोत - गुगल 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
To Top